Have I Been Pwned? या वेबसाईटवर युजर्सला त्यांचा डेटा लीक झाला आहे की नाही हे समजेल. तुमचा फोन नंबर किंवा ईमेल आयडी लीक झाला आहे की नाही याची माहिती या वेबसाईटवर मिळेल.
Have I Been Pwned? या वेबसाईटवर एक बॉक्स दिसेल, इथे तुमचा फोन नंबर इंटरनॅशनल फॉर्मेटमध्ये टाकावा लागेल. जर तुमचा नंबर 1234567890 आहे, तर तो +911234567890 असा टाकावा लागेल.
तुमचा डेटा लीक झाला असेल किंवा लीक झाला नसेल, तरी खाली मेसेजमध्ये याबाबतची माहिती दिसेल.
Have I Been Pwned? चा अनेक पासवर्ड मॅनेजरद्वारा वापर केला जातो. ही वेबसाईट तुमच्या ईमेल किंवा फोन नंबरवरुन, तुमचा फोन किंवा ईमेल डेटा लीकमध्ये सामिल आहे की नाही याची माहिती मिळवते.
यात तुमचा फोन नंबर किंवा ईमेल पब्लिक्ली सर्चमध्ये सामिल न होण्यासाठी otp in करू शकता.