Facebook Account अकाउंट लॉगइन करताना पासवर्ड सिक्योर ठेवा. ओपन Wifi चा वापर करू नका.
तुमची फ्रेंडलिस्ट स्वत:साठीच ओपन ठेवा. तुमचे फ्रेंड्स इतरांना दिसू नये यासाठी who can see your friend list मध्ये only me हा पर्याय निवडा.
तुमच्या अकाउंटवरील फोटो, व्हिडीओ डाउनलोड न होण्यासाठी Lock Your Profile वर क्लिक करा.
अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट न पाठवण्यासाठीचा पर्याय बंद करू शकता. केवळ Friends of Friends हा पर्याय ठेवून अकाउंट अधिक सिक्योर करू शकता.
तसंच फेसबुक अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी Two-factor Authentication ऑन ठेवणं अतिशय आवश्यक आहे.
अनेक जण आपली जन्मतारीख पासवर्ड ठेवतात. यामुळे हॅकर्सला युजर्सचं अकाउंट हॅक करणं लगेच शक्य होतं. Facebook Password मध्ये चुकूनही तुमची पर्सनल माहिती नाव, जन्मतारीख किंवा इतर डिटेल्स ठेवू नका.
तुमचा फोन नंबर, ईमेल आयडी इतरांना दिसू नये, यासाठी Only Me पर्याय निवडा.