चॅट करताना किंवा एखाद्याला मेसेज करताना WhatsApp चं ऑनलाइन स्टेटस हाइड करण्यासाठी थर्ड पार्टी App चीही मदत घेता येते. परंतु या Apps मुळे सिक्योरिटी रिस्क असते.
त्यामुळे कोणत्याही थर्ड पार्टी App शिवाय मेसेजला रिप्लाय करताना ऑनलाइन स्टेटस लपवण्याचा एक सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे.
सर्वात आधी फोनचं नोटिफिकेशन फीचर ऑन करावं लागेल.
म्हणजे एखाद्याचा WhatsApp मेसेज आल्यास तो फोनच्या नोटिफिकेशनमध्येच दिसेल.
जर तुम्ही मेसेजचा रिप्लाय नोटिफिकेशनमधूनच दिला, तर समोरच्या व्यक्तीला किंवा इतरांनाही तुम्ही ऑनलाइन असल्याचं दिसणार नाही.
नोटिफिकेशनवर क्लिक करुन App ओपन करू नका.
नोटिफिकेशनमध्ये WhatsApp मेसेजच्या रिप्लाय ऑप्शनवर क्लिक करुन मेसेज टाइप करुन पाठवा. यामुळे ऑनलाइन स्टेटस हाइड करता येईल.