Instagram Reels डाउनलोड करण्यासाठी अनेक पद्धती आहेत. इन्स्टाग्राम रील्स डाउनलोड करुन आपल्या फोन मेमरीमध्ये सेव्ह करता येतात. यासाठी थर्ड पार्टी App किंवा वेबसाइटचाही वापर केला जातो.
पण थर्ड पार्टी App शिवायही Instagram Reels डाउनलोड करता येतात. एका ट्रिकद्वारे तुम्ही रील्स अँड्रॉईड फोनमध्ये सेव्ह करू शकता.
सर्वात आधी Instagram अपडेट करावं लागेल. त्यानंतर Instagram Account ओपन करा.
त्यानंतर Reels सेक्शनमध्ये जा. इथे जे Reel हवं आहे, त्यावरील शेअर बटणावर क्लिक करा.
इथे Add Reel to your Story या पर्यायावर क्लिक करा.
इथे Preview दिसेल. यात Download चं चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करुन रील्स डाउनलोड करू शकता.
जर रिल्स विना ऑडिओ डाउनलोड करायचं असेल, तर Mute वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर डाउनलोडवर क्लिक करून Reels फोन गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता.