NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / कोणी नकळत तुमचा कॉल रेकॉर्ड तर करत नाहीये ना? असं ओळखा

कोणी नकळत तुमचा कॉल रेकॉर्ड तर करत नाहीये ना? असं ओळखा

मोबाइलवर बोलताना अनेकदा समोरील व्यक्ती तुमचा कॉल रेकॉर्ड करत असल्याचं लक्षात येत नाही. परंतु, काही सोप्या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फोन रेकॉर्ड होत आहे की नाही? हे जाणून घेऊ शकता. चला तर, या टिप्स नेमक्या काय आहेत, ते पाहू

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
    Last Updated: May 22, 2023, 14:59 IST
17

गुगलनं काढून टाकलं फीचर - गुगलनं गेल्या वर्षी सर्व अँड्रॉईड फोनमधून कॉल रेकॉर्डिंग फीचर काढून टाकलं होतं. म्हणजेच तुमच्या फोनमध्ये गुगल डायलर असेल, तर तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय मिळणार नाही. पण त्यानंतरही बऱ्याच जणांना कॉल रेकॉर्डिंग करणं शक्य आहे. कारण त्यांच्या फोनमध्ये गुगल डायलर नाही, किंवा ते कॉल रेकॉर्डिंगसाठी वेगळं अॅप वापरतात.

27

आयफोनमध्ये रेकॉर्डिंग ऑप्शन नाही आयफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग ऑप्शन नाही. आयफोनमध्ये कोणत्याही अॅपवरून कॉल रेकॉर्ड करता येत नाही. मात्र, फोन स्पीकरवर ठेवून इतर कोणत्याही डिव्हाइसद्वारे तुम्ही कॉल नक्कीच रेकॉर्ड करू शकता.

37

तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे? कोणीतरी तुमचा कॉल रेकॉर्ड करत आहे का? हे तुम्हाला अगदी सहज ओळखता येईल. यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

47

मेसेज प्ले होईल गुगलनं कॉल रेकॉर्डिंगबाबत माहिती मिळावी, यासाठी एक मेसेज देण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच, जर तुम्ही अँड्रॉईड युजर असाल, तर कॉल रेकॉर्ड करताना तुमच्या फोनमध्ये एक मेसेज प्ले होईल. युजरनं तुमचा कॉल रेकॉर्ड करताच, तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगबाबतचा मेसेज ऐकू येईल. हा डीफॉल्ट मेसेज आहे.

57

बीप आवाज येईल काही फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग सुरू असताना बीपचा आवाज येतो. कधी दर मिनिटाला हा आवाज येतो, तर कधी कॉल रिसिव्ह करताना येतो. त्यावरून तुम्ही सहजपणे ओळखू शकता की, कोणीतरी तुमचा कॉल रेकॉर्ड करत आहे.

67

कॉल रिसिव्ह केल्यावर येतो आवाज कॉल रेकॉर्डिंग सुरू असताना काही हँडसेटमध्ये कॉल रिसिव्ह केल्यावर लांब बीपचा आवाज येतो. त्यामुळे या पुढे तुम्हाला कोणाचा फोन आला, व तुम्हाला लांब बीपचा आवाज आला, तर समजून घ्या की, ती व्यक्ती तुमचा कॉल रेकॉर्ड करत आहे.

77

महत्त्वाचे कॉल करतात रेकॉर्ड अनेकजण कॉलवरील महत्त्वाचे संवाद रेकॉर्ड करून ठेवत असतात, जेणेकरून भविष्यात त्याचा उपयोग होईल. जर तुम्हाला तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे, असं वाटत असेल तर तुम्ही काही टिप्सच्या मदतीनं ते सहज जाणून घेऊ शकता.

  • FIRST PUBLISHED :