ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) वाढत्या प्रकरणात फोनमधील Google pay चा पीन काही काळानंतर बदलणं फायद्याचं ठरतं. PIN बदलण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
UPI PIN बदलण्यासाठी GPay App ओपन करा. त्यानंतर उजव्या बाजूला वर असलेल्या आपल्या फोटोवर क्लिक करा.
इथे बँक अकाउंटचे पर्याय दिसतील. त्यावर क्लिक करा. ज्या बँक अकाउंटचा पीन बदलायचा आहे, त्या अकाउंटवर क्लिक करा. आता Forgot PIN वर क्लिक करा.
आता डेबिट कार्डचा शेवटचा सहा अंकी नंबर भरावा लागेल. इथे नवा UPI PIN नंबर तयार करता येईल.
त्यानंतर एक OTP येईल. OTP टाकून GPay चा नवा PIN जनरेट होईल.