PhonePe युजर्स 08068727374 किंवा 02268727374 या क्रमांकावर कॉल करू शकतात.
इथे हवी ती भाषा निवडल्यानंतर, फोन पे अकाउंटमध्ये कोणती समस्या रिपोर्ट करायची आहे ते विचारलं जाईल.
आता रजिस्टर्ड नंबर टाका, कन्फर्मेशनसाठी OTP पाठवला जाईल. ओटीपी मिळाला नसल्याच्या पर्यायावर क्लिक करा.
इथे सिम किंवा फोन हरवला असल्याचा पर्याय दिसेल, त्यावर रिपोर्ट करा.
आता कस्टमर केअरशी जोडलं जाता येईल. फोन नंबर, ईमेल, लास्ट ट्रान्झेक्शन, लास्ट ट्रान्झेक्शन रक्कम असे डिटेल्स विचारले जातील. त्यानंतर तुमचं अकाउंट ब्लॉक करण्यासाठी मदत केली जाईल.
Google Pay युजर्स 18004190157 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकतात. हवी ती भाषा निवडा.
जाणाकाराची बोलण्यासाठी हेल्पलाईनवर तो पर्याय निवडा, जो गुगल पे अकाउंट ब्लॉक करण्यासाठी मदत करेल.