अभिनेते रजनीकांत यांच्या 'रोबोट' चित्रपटात कृत्रिम रोबोटने मानवावर हल्ला केल्याचं तुम्हा पाहिलं असेल. अशीच एक घटना सत्यात झाल्याचं बोललं जात आहे. वास्तविक, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला दिसत आहे. व्हिडिओचे कॅप्शन असे आहे की AI रोबोटने 29 शास्त्रज्ञांना मारले. काही पोस्टमध्ये ही घटना जपानमधील आहे तर काहींमध्ये ती दक्षिण कोरियाची असल्याचे म्हटले आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या फॅक्ट चेकिंगमध्ये व्हिडीओ बनावट असल्याचे आढळून आले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, व्हिडिओतील महिला लिंडा मौल्टन हॉवे आहे. ते युफोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी एलियनबद्दल काही पुस्तके लिहिली आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ फेब्रुवारी 2018 चा आहे. जिथे ती लॉस एंजेलिसमध्ये एका कार्यक्रमात होती.
या आठवड्यात एका मोठ्या जपानी रोबोटिक्स कंपनीमध्ये लष्करी उद्देशांसाठी चार रोबोट विकसित करत असल्याचे या क्लिपमध्ये हॉवे यांनी सांगितले आहे. यावेळी प्रयोगशाळेत या रोबोटने 29 लोकांना मारले. त्यांच्या मते रोबोट्सने हे काम मेटल बुलेटच्या माध्यमातून केले.
सर्वात भयानक गोष्ट म्हणजे जेव्हा प्रयोगशाळेतील कामगारांनी यापैकी दोन रोबोट निष्क्रिय केले आणि तिसरा वेगळा केला. त्यावेळी चौथ्या रोबोटने स्वतःला एका उपग्रहाशी जोडून स्वतः रिबिल्ड करण्याची माहिती डाउनलोड करण्यास सुरुवात केली.
मात्र, त्यांनी लॅबचे नाव सांगितले नाही, तसेच ही घटना कधी घडली हे सांगितले नाही. मृत्यू झालेल्या लोकांची नावेही सांगितली नाहीत किंवा घटनेचा छडा लावण्यासाठी अशी कोणतीही माहिती दिली नाही. रॉयटर्सने हॉवेला संपर्क साधला मात्र त्यांनी माहिती दिली नाही.
रॉयटर्सने या घटनेची सत्यता तपासण्यासाठी अनेक बातम्या शोधल्या. मात्र, काहीच हाती लागले नाही. दुसरीकडे जपानचे सरकार आणि उद्योग मंत्रालयाच्या रोबोटिक्स कार्यालयाने हा दावा फेटाळला आहे. एकूणच, रॉयटर्सने निष्कर्ष काढला की व्हायरल व्हिडिओच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी कोणताही पुरावा नाही.