स्मार्टफोन ही काळाजी गरज झाली आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये.
स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या जगभरात मोठी आहे.
परंतु जर स्मार्टफोन वापरताना योग्य ती काळजी घेतली नाही, तर स्मार्टफोन ब्लास्ट होऊ शकतो.
स्मार्टफोन चार्ज करतेवेळी त्यामध्ये हेवी गेम खेळणं टाळावं. कारण चार्जिंग करताना स्मार्टफोन गरम होतो.
चार्जिंग करताना तुम्ही गेमसुद्धा खेळत असाल, तर स्मार्टफोन जास्त गरम होऊन ब्लास्ट होऊ शकतो.
बऱ्याचदा आपण स्मार्टफोन चार्जिंगला लावून झोपी जातो. परंतु ही चूक तुम्ही कधीही करू नये.
स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी कधीही डुप्लीकेट चार्जरचा वापर करू नये.
याशिवाय तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीवर अतिरिक्त ताण पडल्यास ती गरम होऊन ब्लास्ट होऊ शकते.