NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / तुमचं WhatsApp Account कोणीही बंद करू शकतं; रिसर्चरचा खळबळजनक दावा

तुमचं WhatsApp Account कोणीही बंद करू शकतं; रिसर्चरचा खळबळजनक दावा

WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. प्रत्येक मोबाईल युजरसाठी व्हॉट्सअ‍ॅप महत्त्वाचा भाग झालं आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून WhatsApp च्या सुरक्षेबाबतची अनेक आव्हानं समोर येत आहेत. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, कोणीही तुमचं WhatsApp Account बंद करू शकतं असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

15

bgr ने दिलेल्या वृत्तानुसार, नुकतंच एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यात WhatsApp सिक्योरिटी सिस्टमच्या कमजोरीचा फायदा घेत अकाउंट डिअ‍ॅक्टिवेट केलं जाऊ शकतं, असा दावा करण्यात आला आहे.

25

सिक्योरिटी रिसर्चर लुई मार्केज कारपिन्टेरो (Luis Márquez Carpintero) आणि एर्नेस्टो कॅनल्स पेरेना (Ernesto Canales Pereña) यांनी आपल्या नवा शोधात असा दावा केला आहे की, WhatsApp चे काही सिस्टम अतिशय कमजोर आहेत. याचाच फायदा घेत, कोणाचंही अकाउंट बंद केलं जाऊ शकतं.

35

रिपोर्टनुसार, सायबर गुन्हेगार सर्वात आधी कोणच्याही मोबाईलमध्ये WhatsApp अ‍ॅक्सेस करण्यासाठी एखाद्या युजरचा नंबर टाकतात. याचा कोड खऱ्या युजरकडे जातो. हॅकर्स मुद्दाम चुकीचा कोड टाकतात. तीन वेळा चुकीचा कोड टाकल्यानंतर युजरचं WhatsApp अकाउंट 12 तासांसाठी ब्लॉक होतं.

45

12 तासांसाठी एकदा अकाउंट ब्लॉक झाल्यानंतर सायबर क्रिमिनल्स फेक ईमेल आयडी बनवून support@whatsapp.com वर मेल करतात, की मोबाईल चोरी झाला आहे. त्यासोबतच कंपनीला रिक्वेस्ट केली केली जाते, की WhatsApp अकाउंट डिअ‍ॅक्टिवेट केलं जावं.

55

WhatsApp कडे क्रॉस-चेक करण्यासाठी कोणतंही टूल उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ ईमेलच्या विश्वासावरच WhatsApp टीम, अकाउंट डिअ‍ॅक्टिवेट करत असल्याचा दावा रिसर्चरकडून करण्यात आला आहे.

  • FIRST PUBLISHED :