NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / विराट किंवा धोनी नाही तर हा खेळाडू आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर

विराट किंवा धोनी नाही तर हा खेळाडू आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर

क्रिकेट हा जगातील दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. जगभरात या खेळाचे चाहते असून तितकेच क्रिकेट खेळणारे देखील आहेत. क्रिकेट खेळाच्या बाजूने असलेल्या प्रसिद्धीच्या वलयामुळे अनेक क्रिकेटर्सनी करोडोंची संपत्ती उभी केली आहे. अशातच आज आम्ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्स विषयी तुम्हाला सांगणार आहोत.

19

सचिन तेंडुलकर : CEO वर्ल्ड मॅगझीनच्या अहवाल अनुसार भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट आहे. सचिनने 16 नोव्हेंबर 2013 रोजी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तरी देखील सचिन तेंडुलकरची प्रसिद्धी, त्याला मिळणारे ब्रँड इंडोर्समेंटस आणि व्यवसाय इत्यादींमुळे सचिनची वार्षिक कमाई ही जवळपास 1402 कोटींच्या घरात आहे.

29

महेंद्र सिंह धोनी : भारताचा माजी क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी हा क्रिकेटर्समध्ये कमाईच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी रिटायरमेंट जाहीर केली होती. धोनी सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसत असून ब्रँड इंडोर्समेंटस, व्यवसाय इत्यादींमधून त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे 949 कोटीं आहे.

39

विराट कोहली : विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. विराटाचे चाहते जगभरात असून विराट भारतीय क्रिकेट संघातील महत्वाचा अनुभवी खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, आयपीएल, ब्रँड इंडोर्समेंटस आणि व्यवसाय इत्यादींमुळे विराटची कमाई ही 923 कोटी इतकी आहे.

49

रिकी पाँटिंग : रिकी पाँटिंग हा ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटू असून याचे देखील जगभरात चाहते आहेत. 2012 मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु तरी देखील पाँटिंगची कमाई ही जवळपास 617 कोटीं इतकी आहे.

59

जैक कॅलिस : दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जॅक कॅलिस हा जगातील पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत क्रिकेटर असून त्याची वार्षिक कमाई ही 577 कोटी इतकी आहे.

69

ब्रायन लारा : वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ब्रायन लारा हा श्रीमंत क्रिकेटरच्या यादीत सहाव्या स्थानी आहे. त्याची वार्षिक कमाई ही 494 कोटी आहे.

79

वीरेंद्र सेहवाग : भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याने 20 ऑक्टोबर 2015 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. परंतु व्यवसाय आणि ब्रँड इंडोर्समेंट्स इत्यादींमुळे त्याची वार्षिक कमाई ही 329 कोटी इतकी आहे.

89

युवराज सिंह : भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंह याने 2019 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर देखील युवराजची प्रसिद्धी कमी झालेली नाही. त्याची वार्षिक कमाई 288 कोटी आहे.

99

स्टीव्ह स्मिथ : ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर स्टीव्ह स्मिथचे चाहते जगभरात आहेत. तो क्रिकेटमध्ये सक्रिय असून त्याची संपत्ती ही 247 कोटी इतकी आहे.

  • FIRST PUBLISHED :