ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी 4 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. जडेजाला यासाठी आधी फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. डावखुरा फलंदाज जडेजा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. परंतु रवींद्र जडेजाच्या एका ट्विटवर नेटकऱ्यांनी जडेजाला खोचक सल्ला दिला आहे.
रवींद्र जडेजाने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्याची टेस्ट जर्सी शेअर करताना लिहिले, "तुझी आठवण येतेय, पण लवकरच भेटू". जडेजाने एवढे लिहिताच सोशल मीडियावर लोक त्याच्यावर संतापले. आणि त्याला निवृत्ती घेण्याचा खोचक सल्ला दिला.
सध्या रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. अक्षरने दोन्ही ही संधी साधली आणि त्याने संघात चांगले प्रदर्शन केले.अक्षरची चमकदार कामगिरी पाहून लोक म्हणतात की आता त्यांना जडेजाची उणीव भासत नाही.
रॉन्क नावाच्या युजरने लिहिले की, 'तुम्ही दिग्गज अष्टपैलू आहात यात शंका नाही पण अक्षर सध्या उत्कृष्ट लयीत आहे. मला आशा आहे की अक्षरला संघाबाहेर ठेवले जाणार नाही.
रवींद्र जडेजाच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्याचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू आहे. जडेजाचे क्रिकेटमध्ये पुनरागमन त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. अशा परिस्थितीत तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसू शकतो.
रवींद्र जडेजा सौराष्ट्रकडून तामिळनाडूविरुद्ध रणजी सामने खेळताना दिसेल. हा सामना 24 जानेवारीपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे परंतु त्याने एनसीएमध्ये फिटनेस सिद्ध केल्यावरच त्याच्या निवडीचा विचार केला जाईल, असे भारतीय निवडकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. रवींद्र जडेजाने खालच्या फळीत भारतीय फलंदाजी मजबूत केली. तो एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाजही आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना ९ फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे.