NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / ऐश्वर्या-सलमानच्या वादग्रस्त पोस्टनंतर पहिल्यांदाच समोरासमोर आले विवेक-अभिषेक, पाहा काय घडलं

ऐश्वर्या-सलमानच्या वादग्रस्त पोस्टनंतर पहिल्यांदाच समोरासमोर आले विवेक-अभिषेक, पाहा काय घडलं

लोकसभा निवडणुकीवेळी विवेक ओबेरॉयनं ऐश्वर्याबद्दलचं एक मीम शेअर केलं होतं. तेव्हा विवेकला माफी मागावी लागली होती.

  • -MIN READ

    Last Updated: September 09, 2019, 13:45 IST
17

अभिनेता विवेक ओबेरॉय आणि अभिषेक बच्चन यांच्यात असलेल्या दुरावा जगजाहीर आहे. एकेकाळी विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय रिलेशनशिपमध्ये होते. तर सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा सुखाचा संसार सुरु आहे. दरम्यानच्या काळात अभिषेक आणि विवेक या दोघांनीही एकमेकांसमोर येणं टाळलं होतं.

27

आता वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर सिंधूसाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. त्यात अभिषेक बच्चन आणि विवेक ओबेरॉय यांचाही समावेश होता.

37

कार्यक्रमात विवेक ओबेरॉय आणि अभिषेक बच्चन दोघेही समोरासमोर आले. दोघांनीही हसत एकमेकांशी बोलले आणि गळाभेट घेतली. याशिवाय एका व्हिडिओत अमिताभ बच्चन विवेकच्या वडिलांनासुद्धा भेटल्याचं दिसत आहे.

47

काही महिन्यांपूर्वी विवेकने ट्विटरवरून ऐश्वर्या रायच्या फोटोचं एक मीम शेअर केलं होतं. त्यानंतर विवेकला ट्रोलही करण्यात आलं. शेवटी त्यानं माफी मागत पोस्ट डिलीट केली होती.

57

अभिषेक आणि विवेकमध्ये थेट वाद नसला तरी ऐश्वर्या रायमुळं दोघांनीही समोरासमोर येणं टाळलं होतं. या दोघांमध्ये ठिक असलं तरीही विवेक आणि सलमान यांच्यातील वाद मात्र कायम आहे.

67

पीव्ही सिंधूच्या कार्यक्रमात विवेक ओबेरॉय त्याच्या कुटुंबियांसह उपस्थित होता.

77

अमिताभ बच्चनसुद्धा पीव्ही सिंधूच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनीही विवेक ऑबेरॉयच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

  • FIRST PUBLISHED :