विराटने रविवारी कसोटी क्रिकेटमधील आपले 28 वे शतक ठोकले. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये हे विराटाचे 8 वे शतक होते. या शतकासह विराटने सुनील गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
सचिन तेंडुलकरनंतर विराट क्रिकेट विश्वात शतक करणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत 100 शतके केली आहेत. तर विराट 75 शतकांसह या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
अहमदाबादच्या स्टेडियमवर विराटने 75 वे शतक ठोकताच त्याने आपल्या गळ्यातील चैनीतमध्ये असलेले लॉकेट बाहेर काढून त्याला किस केले.
विराटच्या गळ्यातील लॉकेट म्हणजे विराटच्या लग्नातील रिंग असून या रिंगला विराट फार लकी समजतो. यापूर्वी देखील त्याने अनेकदा शतक केल्यावर त्याच्या रिंग लॉकेटला किस केले आहे.
विराट त्याची एंगेजमेंट रिंग ही अनेकदा हातात न घालता गळ्यात घालताना दिसतो
तसेच विराट शतक ठोकल्यानंतर या रिंगला किस करतो आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिला हे शतक समाप्रित करतो. विराट दोन ते अडीच वर्ष क्रिकेटमधील त्याच्या वाईट फॉर्मातून जात होता तेव्हा त्याची पत्नी अनुष्का हिने त्याची साथ दिली होती.