भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईचा राहणारा आहे. तेव्हा त्याने एका मुलाखती दरम्यान सांगितल्याप्रमाणे त्याला मुंबईतील सुप्रसिद्ध स्ट्रीट फूड असलेला 'वडापाव' हा त्याचा आवडता पदार्थ आहे. तसेच रोहितला 'आलू पराठा' देखील पसंत आहे.
'छोले भटुरे' पदार्थ हा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा खूपच आवडता पदार्थ आहे. त्यातही त्याला दिल्ली येथील रजोरी गार्डन येथील छोले भटुरे यांनी चव अधिक आवडते. तसेच विराट कोहलीच्या रेस्टोरंटमधील 'सुशी' तसेच बिटरूट मोमोज हे देखील त्याचे आवडते पदार्थ आहेत.
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला काठियावाडी जेवण तसेच पंजाबी दाल मखनी हे पदार्थ आवडतात.
फलंदाज के एल राहुल याला डोसा हा पदार्थ फार आवडतो.
शुभमन गिल याला आलू पराठा आणि बटर चिकन हे पदार्थ सर्वाधिक आवडतात.
भारताचा स्टार फलंदाज रिषभ पंत याला क्लासिक मसाला ऑम्लेट हा पदार्थ खूप आवडतो.
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला खाण्यात बटर चिकन, नान, कबाब, चिकन टिक्का पिझ्झा हे पदार्थ आवडतात.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला जेवणात खिमा पराठा, प्रॉन्स मसाला, लस्सी, सुशी हे पदार्थ आवडतात.
भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा शाकाहारी असून त्याला त्याच्या आईच्या हातची पनीर आणि शिमला मिर्चीची भाजी सर्वाधिक आवडते.