NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / U-19 World Cup : प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यशस्वीसाठी ठरणार लकी? युवीसारखा होणार सुपरस्टार

U-19 World Cup : प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यशस्वीसाठी ठरणार लकी? युवीसारखा होणार सुपरस्टार

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकणाऱ्या मुंबईच्या यशस्वी जयस्वालने आपल्या शानदार खेळीसह टीम इंडियात आपले स्थान पक्के केले आहे.

17

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकणाऱ्या मुंबईच्या यशस्वी जयस्वालने आपल्या शानदार खेळीसह टीम इंडियात आपले स्थान पक्के केले आहे. यशस्वीने वर्ल्ड कपमध्ये पाचहून अधिकवेळा अर्धशतकी खेळी केली आहे. मात्र अंडर-19 क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणारे फलंदाज भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हमखास आपली छाप सोडतात.

27

आतापर्यंत ज्या ज्या भारतीय फलंदाजांना अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब मिळवला आहे, त्यांनी सिनिअर संघात शानदार कामगिरी केली आहे.

37

या यादीमध्ये पहिले नाव आहे युवराज सिंगचे. युवराजला 2000मध्ये अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये सर्वश्रेष्ठ फलंदाजाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2007चा टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वर्ल्ड कपमध्ये युवराज भारतासाठी मॅच विनर ठरला.

47

युवराजनंतर 2004मध्ये असेच काहीसे प्रदर्शन शिखर धवनने केले. त्यामुळं या वर्ल्ड कपमध्ये धवनला बेस्ट प्लेअरचा किताब मिळाला. त्यानंतर धवनने टी-20, एकदिवसीय आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताला अनेक सामने जिंकून दिले.

57

या यादीत पुढचे नाव आहे चेतेश्वर पुजारा. 2006च्या वर्ल्ड कपमध्ये प्लेअर ऑफ टुर्नामेंटचा मान मिळवला आणि त्यानंतर पुजारा भारताचा नवा ‘द वॉल’ म्हणून पुढे आला.

67

पुजारानंतर कोणत्याच खेळाडूला हा किताब मिळवला आला नाही. अंडर-19मध्ये सर्वश्रेष्ठ फलंदाज होण्यासाठी भारताला 12 वर्ष वाट पाहावी लागली. 2018मध्ये शुभमन गीलने हा मान मिळवला. सध्या गील भारताकडून कसोटीमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तर आयपीएलमध्ये गील शानदार कामगिरी करत आहे.

77

त्यामुळं वर्ल्ड कपच्या 6 सामन्यात 400हून अधिक धावा करणाऱ्या यशस्वीने जवळजवळ टीम इंडियात आपली जागा निश्चित केली आहे. त्यामुळं पुढील काही वर्षात यशस्वी टीम इंडियाचा सुपरस्टार होऊ शकतो.

  • FIRST PUBLISHED :