NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / या भारतीय क्रिकेटर्सच्या पत्नी आहेत वयाने त्यांच्यापेक्षा मोठ्या

या भारतीय क्रिकेटर्सच्या पत्नी आहेत वयाने त्यांच्यापेक्षा मोठ्या

भारतात मनोरंजन सृष्टीनंतर क्रिकेट हे फार ग्लॅमर्स प्रोफेशन आहे. क्रिकेट हा देशातील सर्वात लोकप्रिय खेळ असल्याने आपल्या आवडत्या खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना फार रस असतो. काही भारतीय क्रिकेटर्सनी त्यांच्या पेक्षा जास्त वयाच्या महिलांशी लग्न केलं आहे. त्या कोण आहेत यांच्या विषयी आज आपण जाणून घेऊयात.

16

भारतात मनोरंजन सृष्टीनंतर क्रिकेट हे फार ग्लॅमरस प्रोफेशन आहे. क्रिकेट हा देशातील सर्वात लोकप्रिय खेळ असल्याने आपल्या आवडत्या खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना फार रस असतो. काही भारतीय क्रिकेटर्सनी त्यांच्या पेक्षा जास्त वयाच्या महिलांशी लग्न केलं आहे. त्या कोण आहेत यांच्या विषयी आज आपण जाणून घेऊयात.

26

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच या दोघांनी 31 मे 2020 रोजी लग्न केलं. या दोघांचा विवाह तेव्हा कोर्ट मॅरेज पद्धतीने झाला होता. नताशा आणि हार्दिक हे दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत होते. काही दिवसांपूर्वी शाही लग्नाची हौस पूर्ण करण्यासाठी तयांनी उदयपूर येथे हिंदू आणि ख्रिस्तचन पद्धतीने विवाह केला. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा ही त्याच्या पेक्षा 1 वर्षाने मोठी आहे.

36

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी 15 मार्च 2021 रोजी विवाह केला. जसप्रीत हा भारताचा स्टार वेगवान गोलंदाज असून त्याची पत्नी संजना ही स्पोर्ट्स प्रेसेंटर आहे. संजना आणि जसप्रीत यांचाही प्रेम विवाह असून ती जसप्रीतपेक्षा 1 वर्ष 7 महिन्यांनी मोठी आहे.

46

क्रिकेटचा देव अशी ख्याती असणारा भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने 24 May 1995 रोजी अंजली हिच्याशी विवाह केला. अंजली ही प्रोफेशनने डॉक्टर असून सचिन पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला होता. मैदान गाजवणाऱ्या सचिनला त्याची पत्नी अंजली नेहमी प्रोत्साहन द्यायची. अंजली ही सचिन पेक्षा पाच वर्ष मोठी आहे.

56

भारताचा अनुभवी क्रिकेटर शिखर धवन याने आयेशा मुखर्जी हिच्याशी 30 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न केलं. परंतु यांचं लग्न हे फार काळ टिकू शकलं नाही. शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांनी सप्टेंबर 2021 रोजी घटस्फोट घेतला असून दोघे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. शिखर धवन त्याची पूर्व पत्नी आयेशा पेक्षा 10 वर्षांनी लहान होता.

66

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा या दोघांनी एकमेकांना बराच काळ डेट करून शेवटी 11 डिसेंबर 2017 रोजी लग्न केले. विराट अनुष्का पेक्षा सहा महिन्यांनी लहान आहे.

  • FIRST PUBLISHED :