NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Suryakumar Yadav : सूर्यकुमार IPL मध्ये फ्लॉप, पण इथं कमावलं नाव, सगळेच पडले मागे

Suryakumar Yadav : सूर्यकुमार IPL मध्ये फ्लॉप, पण इथं कमावलं नाव, सगळेच पडले मागे

भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या खराब फॉर्मातून जात आहे. कधीकाळी आपल्या बॅटिंगने क्रिकेटचे मैदान गाजवणारा सूर्या गेल्या सहा डावात चार वेळा पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला आहे. टी20 क्रिकेटमध्ये आपल्या फटकेबाजीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सूर्यकुमार यादवला आयपीएलमध्ये यंदा सूर गवसलेला नाही. परंतु असे असताना बुधवारी आयसीसीकडून सूर्यकुमारला आनंदाची बातमी मिळाली आहे.

16

जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सिजनला सुरुवात झाली असून आयपीएलमधील मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात विजय मिळवून विजयाचे खाते उघडले.

26

परंतु याच दरम्यान मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा सलग 6 व्या सामन्यात चौथ्यांदा शुन्य धावा करून बाद झाला आहे. कधीकाळी आयपीएलचे मैदान गाजवणाऱ्या 'Mr 360' ने आयपीएल 2023 च्या तीन सामन्यात केवळ 16 धावा केल्या आहेत.

36

सूर्याला त्याच्या खराब फॉर्मवरून सध्या प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. मात्र अशातच आयसीसीकडून त्याच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

46

आयसीसीने बुधवारी टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुरुष फलंदाजीची टॉप रँकिंग जाहीर केली. यामध्ये सूर्यकुमारने आपले सर्वोच्च स्थान कायम ठेवले आहे.

56

या रँकिंगमध्ये सूर्यकुमार 906 रेटिंग सह प्रथम स्थानी आहे. तर त्याखालोखाल पाकचा मोहम्मद रिजवान 811 रेटिंग सह दुसऱ्या स्थानी तर पाक कर्णधार बाबर आजम 755 रेटिंगने तिसऱ्या स्थानी आहे.

66

सध्या सूर्या प्रथम स्थानावर विराजमान असला तरी लवकरच न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पाच टी 20 मॅच खेळवल्या जाणार आहेत. यामुळे मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम हे चांगली कामगिरी करून सूर्याच्या प्रथम स्थान काबीज करू शकतात. तेव्हा यापुढे सूर्याला टी20 क्रिकेटमधील त्याची कामगिरी सुधारण गरजेचं असणार आहे.

  • FIRST PUBLISHED :