दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमी फायनलचा पहिला सामना पारपडला. या सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव झाला असून यामुळे भारताचं महिला टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न पुन्हा भंग पावलं. पुन्हा सेमीफायनलमध्ये येऊन भारताचा पराभव झाल्यामुळे ही हार खेळाडूंसह भारतीय क्रीडा प्रेमींच्या जिव्हारी लागली.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात काल झालेल्या सामन्यात भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना भारतासाठी मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 173 धावांचा आव्हान दिल्यानंतर मैदानात सलामी फलंदाज म्हणून आलेली स्मृती अवघ्या 2 धावा करून बाद झाली.
सेमी फायनल सामन्यानंतर स्मृतीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात स्मृतीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
स्मृतीचे सौंदर्य आणि तिच्या खेळाची अनेकांना भुरळ पडली असून ती अनेक तरुणांची क्रश आहे. परंतु स्मृतीने तिच्या क्रशबद्दल एका मुलाखतीतून खुलासा केला आहे. अमेझॉन प्राईमवर स्मृतीला काही रॅपिड फायर प्रश्न विचारण्यात आले.
यात स्मृतीला तीचा सेलिब्रिटी क्रश कोण आहे अशा प्रश्न करण्यात आला. त्यावेळी स्मृतीने एका सेकंदाचाही अवधी न घेता बॉलिवूडचा सुपर हिरो रितिक रोशनचे नाव घेतले. अभिनेता रितिक रोशन हा स्मृतीचा सेलिब्रिटी क्रश असून तिला त्याची स्टाईल फार आवडते.
याच सह स्मृतीने रॅपिड फायर राउंडमध्ये अनेक प्रश्नांची उत्तर दिली. यात तू जर क्रिकेटर नसतीस तर तू काय करत असतीस असा प्रश्न स्मृतीला विचारण्यात आला. तेव्हा स्मृतीने मी क्रिकेटर नसते तर शेफ बनले असते असे सांगितले. मला कुकींगची खूप आवड असल्याचे स्मृतीने सांगितले.