झी टीव्ही वरील प्रसिद्ध हिंदी मालिका कुंडली भाग्य यामधील कलाकारांसोबत क्रिकेटर शिखर धवनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या फोटोंमध्ये शिखर धवन एका पोलीसाच्या वेशात दिसत असून यातील एका फोटोमध्ये तो दबंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत गुंडांना मारताना दिसत आहे.
फॅन्सना शिखर धवन याचा हा लूक फार आवडतं असून याफोटोंवर फॅन्स लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.
कुंडली भाग्य या मालिकेतील काही कलाकारांसोबत शिखरने फोटो व्हायरल झाल्यामुळे तो लवकरच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो असे बोलले जात आहे.
शिखर धवनला मागील काही काळापासून टीम इंडियाच्या मुख्य संघात संधी मिळत नाहीये. भारताने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका जिंकली तर सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेत देखील शिखर धवन याला संघात स्थान देण्यात आले नाही.
शिखर धवनचा पोलीस लूकमधील फोटो व्हायरल झाल्यामुळे त्याचे फॅन त्याला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.