के एल राहुल आणि अक्षर पटेलनंतर आता भारताचा स्टार क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर देखील लग्न बंधनात अडकणार आहे. २७ फेब्रुवारीला शार्दूल त्याची मैत्रीण मिताली परुळकर सोबत विवाह करणार असून सध्या त्यांच्या विवाह समारंभाची सर्वत्र धामधूम सुरु आहे. तेव्हा प्रेमात लॉर्ड ठाकूरची विकेट काढणारी मिताली परुळकर नेमकी कोण आहे हे आज आपण जाणून घेऊयात.
शार्दुलने मिताली परुळकरला अनेक वर्ष डेट केल्यानंतर त्याने नोव्हेंबर 2021 मध्ये तिच्याशी साखरपुडा केला होता.
मिताली परुळकर ही एक बिझनेस वुमन असून ती ठाणे शहरात 'ऑल द बेक्स' नावाची स्टार्टअप कंपनी चालवते.
25 फेब्रुवारीला शार्दूल आणि मितालीच्या लग्नातील इतर कार्यक्रमांना सुरुवात झाली. शार्दुलच्या हळदीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात तो झिंगाट गाण्यावर कुटुंब आणि मित्रांसह डान्स करताना दिसला.
शार्दूल आणि मिताली यांचा विवाह कर्जत येथील एका मोठ्या फार्महाउसवर होणार असून यांच्या लग्नाला सुमारे 200 ते 250 पाहून उपस्थित राहतील.
शार्दूल भारतीय संघासोबत न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत व्यस्त होता. त्यामुळे मितालीनेच लग्नाच्या कपड्यांपासून ते आयोजनापर्यंत सगळ्याची तयारी केली आहे.