सध्या भारतीय क्रिकेट विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच भारताचा उपकर्णधार के एल राहुल अभिनेत्री अथिया शेट्टी सोबत लग्नबंधनात अडकला. तर त्यापाठोपाठ अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्याने तर दुसऱ्यांदा त्याची पत्नी नताशा हिच्या सोबत व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी लग्न केले. आता भारताचा मराठमोळा क्रिकेटर शार्दूल ठाकूर देखील लग्न करणार आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या 27 तारखेला शार्दूल ठाकूर त्याची मैत्रीण मिताली परुळकर सोबत लग्न करणार आहे.
दोघांच्या लग्नाच्या तारखेबाबत शार्दुलची होणारी पत्नी मितालीनेच सर्वांना माहिती दिली होती.
शार्दुलची पत्नी मिताली ही बिझनेस वुमन असून शार्दुलने नोव्हेंबर 2021 मध्ये तिच्यासोबत साखरपुडा केला होता.
शार्दूल ठाकूर आणि मिताली या दोघांचे लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीने होणार आहे. भारतीय संघाच्या वेळापत्रकामुळे शार्दूल खूप व्यस्त असल्याने यालग्नाची सर्व तयारी मिताली हिनेच केली आहे.
200 पाहुण्याच्या उपस्थिती हे दोघे लग्न करणार असून या लग्नाला अनेक विशेष मान्यवर देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.