NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / शेन वॉर्नचा पत्नी-गर्लफ्रेंडला ठेंगा, दुसऱ्यांनाच केलं मालामाल! मृत्यूपत्र आलं समोर

शेन वॉर्नचा पत्नी-गर्लफ्रेंडला ठेंगा, दुसऱ्यांनाच केलं मालामाल! मृत्यूपत्र आलं समोर

शेन वॉर्नचं भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोइंग होतं. आयपीएलमध्ये वॉर्नने राजस्थानला पहिल्याच मोसमात विजयी केलं. मागच्या वर्षी मार्च महिन्यात शेन वॉर्नचा थायलंडमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता, ज्यामुळे क्रिकेट विश्वाला धक्का बसला.

18

ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्नने त्याच्या करिअरमध्ये अनेक विक्रम केले जे मोडणं अशक्य आहे. 145 टेस्टमध्ये शेन वॉर्नने 708 विकेट घेतल्या. वॉर्न सहावेळा ऍशेस जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचा भाग होता, याशिवाय 1999 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीममध्येही शेन वॉर्न होता.

28

क्रिकेटच्या मैदानात रेकॉर्ड करणाऱ्या शेन वॉर्नचं वैयक्तिक आयुष्य कायमच वादात राहिलं. गर्लफ्रेंड लिज हर्लेसोबतचं नातं असो किंवा निर्वस्त्र फोटो व्हायरल होणं, शेन वॉर्न मैदानाबाहेरही चर्चेत राहिला. या सगळ्या वादांची परवा न करता शेन वॉर्नने त्याचं आयुष्य एन्जॉय केलं.

38

मागच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये शेन वॉर्नचा मृत्यू झाला. यानंतर आता शेन वॉर्नचं मृत्यूपत्र समोर आलं आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार वॉर्नने त्याच्या मृत्यूपत्रात माजी पत्नी सिमोन कैलहनसाठी एकही पैसा ठेवलेला नाही. याशिवाय शेन वॉर्न इंग्लिश अभिनेत्री लिज हर्लेला डेट करत होता. मृत्यूपत्रात वॉर्नने हर्लेलाही काहीही दिलेलं नाही.

48

ऑस्ट्रेलियाच्या सुप्रीम कोर्टाने शेन वॉर्नच्या एकूण संपत्तीचं आकलन केलं आहे. वॉर्नची एकूण संपत्ती $20,711,013.27 एवढी आहे. शेन वॉर्न आणि सिमोन कॅलहन यांचं लग्न 15 वर्ष टिकलं. यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. वॉर्नने घटस्फोटावेळीच सिमोनला पोडगी दिली होती. तर गर्लफ्रेंड लिस हर्लेबद्दल शेन वॉर्नची कोणतीही आर्थिक जबाबदारी नव्हती.

58

शेन वॉर्नने त्याच्या मृत्यूपत्रात संपत्तीचा सर्वाधिक हिस्सा मुलांनाच दिला आहे. शेन वॉर्नला तीन मुलं आहेत. त्याचा मुलाचं नाव जॅकसन वॉर्न आहे, तर दोन मुलींची नावं समर आणि ब्रूक आहे. वॉर्नने तीन मुलांना समसमान 31 टक्के हिस्सा दिला आहे.

68

मुलांसोबतच वॉर्नने भावाच्या मुलांनाही संपत्तीतला काही भाग देण्याचा निर्णय घेतला आहे. संपत्तीच्या उरलेल्या 7 टक्क्यांपैकी वॉर्नने 2 टक्के भाऊ जेसनला दिले आहेत. याशिवाय जेसनची दोन मुलं सेबेस्टियन आणि टायला यांना वॉर्नने संपत्तीतला 2.5 टक्के वाटा दिला आहे.

78

शेन वॉर्नवर $295,000 उधारीही आहे. ही उधारी क्रेडिट कार्ड आणि घराच्या भाड्याच्या रुपात आहे. याशिवाय वॉर्नकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेन्ज आणि यामाहाची मोटरसायकल आहे, ज्याची किंमत $375,500 आहे, जी वॉर्नने मुलगा जॅक्सनला दिली आहे.

88

शेन वॉर्नवर $295,000 उधारीही आहे. ही उधारी क्रेडिट कार्ड आणि घराच्या भाड्याच्या रुपात आहे. याशिवाय वॉर्नकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेन्ज आणि यामाहाची मोटरसायकल आहे, ज्याची किंमत $375,500 आहे, जी वॉर्नने मुलगा जॅक्सनला दिली आहे.

  • FIRST PUBLISHED :