सना गांगुली ही 22 वर्षांची असुन तिचा जन्म 3 नोव्हेंबर 2001 मध्ये झाला होता. सना ही लॅमलाईट पासून दूर असली तरी अनेकदा ती वडील सौरव यांच्यासोबत काही इव्हेंट्सला दिसत असते.
सना गांगुली ही प्रशिक्षित ओडिशा डान्सर असून ती अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेताना पाहायला मिळते.
सनाने आपले उच्च शिक्षण लंडनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून पूर्ण केले आहे.
सनाने आपले उच्च शिक्षण लंडनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून पूर्ण केले आहे.
वयाच्या सातव्या वर्षी तिने नृत्य नाटक कृष्णा मध्ये श्री कृष्णाची भूमिका करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.
2009 मध्ये सौरव गांगुली सोबत ती एका जाहिरातीमध्ये दिसली होती.
सना 2019 मध्ये चर्चेत आली होती. CAA विरोधात निदर्शने करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी सनाने डिसेंबर 2019 मध्ये एक इंस्टाग्राम पोस्ट केली होती. मात्र, नंतर वडील सौरव गांगुली यांनी त्यावर स्पष्टीकरण देत, "सना राजकारण समजण्यासाठी खूप लहान आहे" असे उत्तर दिले होते. त्यानंतर सनाने ती वादग्रस्त पोस्ट डिलीट केली.