भारतीय संघाचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर 16 फेब्रुवारीच्या रात्री काही तरुणांच्या समूहाने हल्ला केला. पृथ्वी शॉने सेल्फी देण्यास नकार दिल्यामुळे हा प्रकार घडला असून यात तरुणांनी पृथ्वी बसलेल्या गाडीवर हल्ला करून त्याची काच फोडली. या तरुणांमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिलचा देखील समावेश होता. याप्रकारानंतर तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या सपना गिल हिने सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.
सपना गिल हिचा पृथ्वी शॉला मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात सपना पृथ्वीच्या अंगावर धावून जाताना दिसत होती. या प्रकारानंतर पृथ्वी शॉने त्याच्या गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी सपना गिल आणि काही तरुणांविषयी पोलिसात तक्रार केली.
पृथ्वीच्या या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी सपना आणि तिच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले. परंतु काही दिवसांनी सपना जामिनावर तुरुंगाबाहेर आली.
जामिनावर सुटल्यावर तिने पृथ्वी शॉवर विनयभंग केल्याचा आरोप केला. तसेच पृथ्वीने आपल्या प्रायव्हेट पार्टला हात लावल्याची देखील तिने तक्रार केली.
जामिनावर बाहेर आल्यावर सपना ही पुन्हा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाली आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
सपना गिल ही अभिनेत्री देखील असून तिने काही भोजपुरी सिनेमांमध्ये काम केले आहे.