1980 आणि 90 च्या दशकाच्या सुरुवातीस मारुती सुझुकी 800 ची मोठी क्रेज असून ती त्याकाळी प्रत्येक व्यक्तीची ड्रीम कार होती. मारुती सुझुकी 800 ही सचिन तेंडुलकरची पहिली स्वत: खरेदी केलेली कार होती.
BMW X5M, ही BMW X5 ची सुधारित आवृत्ती असून सचिन तेंडुलकरने ही कार परदेशातून आयात केली होती. पूर्वी अनेकदा सचिन स्वतः ही गाडी चालवताना दिसायचा. या कारची किंमत सुमारे 2 कोटींच्या घरात आहे.
BMW 7-Series 750L ही देखील सचिन तेंडुलकरच्या आलिशान गाड्यांपैकी एक असून याची किंमत सुमारे 1.70 कोटी इतकी आहे.
भारतात BMW M6 ग्रॅन कूप ही कार सचिन तेंडुलकरच्या नावावर वितरित करण्यात आली होती. याची किंमत सुमारे 1.87 कोटी आहे.
BMW M5 30 Jahre ही सचिनच्या कार कलेक्शनमधील एक असून याची किंमत देखील सुमारे 1.87 कोटी इतकी आहे.
BMW i8 ही सचिन तेंडुलकरच्या महागड्या कार पैकी एक आहे . याची भारतातील किंमत सुमारे 2.62 कोटी इतकी आहे.
Nissan GT-R Egoist ही सचिनच्या आवडत्या कार पैकी एक असून यात सचिनने त्याच्या आवश्यकतेनुसार अनेक बदल केले आहेत. याची किंमत सुमारे 2.12 कोटी इतकी आहे.
Ferrari 360 Modena : Fiat ने सचिन तेंडुलकरला सर डॉन ब्रॅडमन यांच्या 29 कसोटी शतकांचा विक्रम मोडल्यानंतर फेरारी 360 मोडेना भेट दिली होती. या गाडीची एकूण किंमत 1.1 कोटींच्या घरात आहे.
सचिन तेंडुलकर हा पूर्वी Fiat चा ब्रँड अंबॅसिडर होता. कंपनीने 2002 मध्ये त्याच्या नावावर Fiat car चे एक मॉडेल लाँच केले आणि त्याला Fiat Palio S10s ही गाडी भेट म्हणून दिली.
Mercedes-Benz C36 AMG ही देखील सचिनच्या लक्झरी कार पैकी एक आहे. याची किंमत 1.33 कोटी इतकी आहे.