आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून जबरदस्त कामगिरी करणारा मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड त्याची मैत्रीण उत्कर्षा पवार हिच्या सोबत लग्न करणार आहे.
ऋतुराजची पत्नी उत्कर्षा ही देखील एक क्रिकेटर असून तिने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राच्या टीमकडून खेळली आहे.
ऋतुराज आणि उत्कर्षा यांचं लग्न महाराष्ट्रातील महाबळेश्वर या निसर्गरम्य ठिकाणी होणार असून त्यांच्या लग्नाला क्रिकेटमधील दिग्गजांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे.
ऋतुराज आणि उत्कर्षाच्या यांचा मेहेंदी समारंभ नुकताच पारपडला असून त्यांच्या मेहेंदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
उत्कर्षाने ऋतुराजच्या नावाची मेहंदी काढली असून ऋतुराजने देखील त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव मेहेंदीने आपल्या हातावर काढले आहे.
सध्या ऋतुराजने त्याच्या हातावर काढलेली उत्कर्षाच्या नावाची मेहेंदी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.