आरसीबीने ट्विटरवर होळी सेलिब्रेशनचे फोटो ट्विट करून सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
आज देशभरात सर्वत्र रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा प्रथमच होत असलेल्या महिला प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने काल मुंबई इंडियन्स कडून पराभूत झाल्यानंतर आज रंगपंचमीचा सण साजरा केला.
यात भारतासह विदेशातील खेळाडूंनी देखील होळीचा आनंद लुटला.
फोटोंमध्ये संपूर्ण संघ हा रंगात नाहून निघाला आहे.
RCB च्या महिला संघाची कर्णधार स्मृती मानधना हिला निळ्या रंगाने रंगवण्यात आले होते.