NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / क्रिकेटर पृथ्वी शॉ 23 व्या वर्षी आहे कोट्यधीश! वाचा किती आहे त्याची संपत्ती

क्रिकेटर पृथ्वी शॉ 23 व्या वर्षी आहे कोट्यधीश! वाचा किती आहे त्याची संपत्ती

भारताचा युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे तो सध्या भोवऱ्यात अडकला आहे. पृथ्वी शॉ हा भारताचा तरुण धडाकेबाज फलंदाज असून तो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. तेव्हा पृथ्वी शॉची संपत्ती किती आहे थोडक्यात जाणून घेऊयात.

16

भारताचा युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काल सेल्फी न देण्याच्या कारणावरून पृथ्वी शॉ बसलेल्या गाडीवर सोशल मीडिया इन्फ्लूएंसर सपना गिल आणि तिच्या मित्रांनी हल्ला केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे बरीच खळबळ उडाली आहे. दोन्ही ही बाजुंनी ओशिवारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली गेली आहे. पृथ्वी शॉवर तरुणीने मद्यपान करून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच पृथ्वीने दाखल केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी सपना गिल आणि तिच्या मित्रांना अटक करण्यास सुरुवात केली आहे.

26

पृथ्वी शॉ हा मूळचा मुंबई येथील असून त्याने लहान वयातच भारतीय संघात पदार्पण केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. नुकत्याच भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या टी 20 सामन्यातही त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.

36

भारतीय संघ, आयपीएल सामने आणि जाहिराती इत्यादींमधून पृथ्वी शॉचे उत्पन्न येत असून त्याची वार्षिक कमाई सुमारे 24 कोटी इतकी आहे.

46

मागील वर्षी पृथ्वी शॉने मुंबईतील बांद्रे परिसरातील पॉश सोसायटीमध्ये 8 व्या मजल्यावर घर खरेदी केले. या घराची किंमत 10.5 कोटी इतकी असून घराचे कॉर्पोरेट क्षेत्र 2209 स्क्वेअर फूट आहे. पृथ्वी शॉला त्याच्या नवीन घरासह तीन कार पार्क करण्यासाठी जागाही मिळाली आहे.

56

पृथ्वी शॉ हा इंडियन प्रीमियर लीग मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. आयपीएलमधून पृथ्वीने आतापर्यंत 20 कोटींची कमाई केली आहे.

66

पृथ्वी शॉ अनेक लग्झरी गाड्यांचा मालक आहे. यात बीएमडब्ल्यू 6 सीरीज कारचा समावेश असून याची किंमत दोन वर्षांपूर्वी 68 लाख रुपये होती.

  • FIRST PUBLISHED :