कर्नाटकातील बंगळुरू येथे भारतीय ऊर्जा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याला सप्ताहाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी पंतप्रधान मोदींना जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या नावाची जर्सी भेट देण्यात आली.
अर्जेंटिनाची ऊर्जा कंपनी YPF चे अध्यक्ष पाब्लो गोन्झालेझ यांनी पंतप्रधान मोदींना लिओनेल मेस्सीचे नाव असलेली अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाची जर्सी भेट दिली. YPF ही कंपनी मागील अनेक वर्षांपासून अर्जेंटिनाच्या टीमची स्पॉन्सर आहे. त्यांच्या कंपनीने नाव मागील अनेक वर्षांपासून अर्जेंटिनाच्या जर्सीवर झळकताना पहावयास मिळते.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिनाने फ्रान्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा रोमहर्षक विजय मिळवून फिफा वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. या विजयामुळे अर्जेंटिनाचा फिफा वर्ल्ड कपमधील दुष्काळ संपला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अर्जेंटिनाचे वर्ल्ड चॅम्पियन बनल्याबद्दल अभिनंदन केले होते.
जगभरात लिओनेल मेस्सीचे अनेक चाहते असून त्याला फुटबॉल लागतातील सम्राट असं देखील म्हंटले जाते.
लिओनेल मेस्सीने आतापर्यंत 796 गोल केले असून तो पाच वेळा युरोपिअन गोल्डन शूज जिंकणारा पहिला खेळाडू आहे.
फिफा वर्ल्ड कप 2022 नंतर लिओनेल मेस्सी फुटबॉल जगतातून निवृत्ती घेईल असे बोलले जात होते., परंतु असा कोणताही विचार नसल्याचे मेस्सीने स्पर्धेनंतर स्पष्ट केले.