बॉलिवूडमधील एक काळ गाजवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिची लोकप्रियता आजही कुणापेक्षा कमी नाही. सोनाली बेंद्रेने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले असून ती वयाच्या 48 व्या वर्षी देखील सिनेसृष्टीत सक्रिय आहे.
मराठमोळी अभिनेत्री सोनालीचे नाव सुनील शेट्टीसह अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले होते. यामध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरच्या नावाचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोएब अख्तर याला सोनाली बेंद्रे खूप आवडत होती.
अनेक वृत्तानुसार, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर सोनालीसाठी कोणत्याही थराला जायला तयार होता. एका मुलाखतीत क्रिकेटपटूने तिच्या अपहरणाबद्दलही सांगितले होते. आपला प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर तिचे अपहरण करू, असे त्याने एका मुलाखतीत गंमतीत म्हंटले होते.
सोनाली बेंद्रेचे नाव बॉलिवूडच्या अभिनेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी देखील जोडले गेले होते. परंतु सोनालीला दिग्दर्शक गोल्डी बहलच्या रूपात तिच्या आयुष्यभरचा जोडीदार मिळाला.
12 नोव्हेंबर 2002 रोजी त्यांचे लग्न झाले होते. दोघेही 1994 मध्ये भेटले होते. त्यानंतर गोल्डी सोनालीला खूप आवडू लागला होता.
सोनालीने हिंदी व्यतिरिक्त मराठी, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.
पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब अख्तर याने देखील रुबाब खान हिच्याशी २०१४ मध्ये लग्न केले. आता त्यांना दोन मुलं आहेत.