2018 मध्ये, केएल राहुलला RBI बँकमध्ये असिस्टंट मॅनेजर पद देण्यात आले. राहुल आता आरबीआयचा कर्मचारी असून टीव्हीवर राहुल RBI च्या जाहिरातींमध्ये दिसतो.
2011 मध्ये, भारतीय प्रादेशिक सैन्याने धोनीला लेफ्टनंट कर्नल पद देऊन सन्मानित केले. 2019 मधील आयसीसी वनडे वर्ल्ड कपनंतर, त्याने दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारतीय सैन्यदलातही सेवा दिली होती.
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला 2010 मध्ये भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टनची रँक देण्यात आली आहे.
भारताचा माजी क्रिकेटर आणि गोलंदाज हरभजन सिंहचे खेळातील शानदार प्रदर्शन पाहून पंजाब सरकारने त्याला पंजाब पोलीसमध्ये डीएसपीची पोस्ट दिली आहे.
१९८२ साली भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कॅप्टन कपिल देव यांना 2008 मध्ये भारतीय प्रादेशिक सैन्याने लेफ्टनंट कर्नल या प्रतिष्ठित रँकने सन्मानित केले.
माजी क्रिकेटर जोगिंदर शर्मा क्रिकेटरमधून निवृत्ती घेतल्यानंतर हरियाणा पुलिस मध्ये उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
भारताचा अनुभवी गोलंदाज उमेश यादवला 2017 मध्ये, स्पोर्ट्स कोट्यातून RBI बँकमध्ये असिस्टंट मॅनेजरची नोकरी मिळाली. उमेश यादव RBI च्या जाहिरातींमध्येही दिसतो.
भारताचा अनुभवी गोलंदाज युझवेंद्र चहल हा आयकर विभागात इंस्पेक्टर पदावर कार्यरत आहे.