काही वर्षांपूर्वी बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित हीच नाव भारताचा माजी क्रिकेटर अजय जडेजाशी जोडलं गेलं होत. माधुरी अजय जडेजाच्या प्रेमात इतकी वेडी होती कि ती त्याच्या करता सर्वकाही सोडून त्याच्या सोबत राहण्यास तयार होती.
अजय जडेजा आणि माधुरी यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूट दरम्यान झाली होती. या शूट दरम्यान हे दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि त्यानंतरच दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या.
अजय जडेजा याला क्रिकेट सोबतच अभिनयाची आवड देखील होती. तेव्हा अजयला चित्रपटात काम मिळावे म्हणून माधुरीने बरेच प्रयन्त देखील केले. या दोघांना एका सिनेमात कास्ट करण्यासाठी एक निर्माता तयार देखील झाला होता.
अजय जडेजा हे गुजरातमधील एका राजघराण्यातील मुलगा आहे. राजा रणजितसिंहजी हे त्यांच्या वडिलांचे आजोबा होते. ज्यांच्या नावावर "रणजी ट्रॉफी" ही देशातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा खेळली जाते.
माधुरी दीक्षित ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी असल्याने तिची अजय सोबत वाढत असलेली जवळीक जडेजा कुटुंबाला पटली नाही. तसेच याच दरम्यान अजयचे नाव हे अजरुद्दीन सोबत एका मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात जोडले गेले. त्यानंतर माधुरीच्या कुटुंबाने देखील या दोघांच्या नात्यावर आक्षेप घेतला.
अखेर माधुरी अजय जडेजा पासून दूर झाली. तिने 1999 मध्ये डॉ श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला. तर अजय जडेजाने देखील 2000 साली अदिती जेटली हिच्या सोबत लग्न केले.