आयपीएल 2023 च्या हंगामासाठी लखनौ सुपर जायंट्सने आज आपल्या नव्या जर्सीचे अनावरण केले
लखनौ संघाची ही नवी जर्सी गडद निळ्या रंगाची असून जर्सीच्या अनावरण सोहोळ्यावेळी संघाचा कर्णधार केएल राहुलसह दीपक हुड्डा आणि जयदेव उनाडकट हे देखील उपस्थित होते.
लखनौ सुपर जायंट्सची नव्या जर्सीचे अनावरण होताच ती सगळीकडे व्हायरल देखील झाली. अनेक चाहत्यांनी नव्या जर्सीची तुलनाडेक्कन चार्जर्सच्या जर्सीशी केली आहे.
लखनौने त्यांच्या जर्सीवर पारंपरिक निळा रंग आणि त्यात साईड पॅनलला लाल रंगाच्या छटा वापरल्या आहेत.
२०२२ हे वर्ष लखनौ सुपर जायंट्सचे पहिलेच वर्ष होते. पहिल्याच हंगामात केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सने १७ सामन्यांपैकी ९ सामने जिंकून स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले.