NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / क्रिकेटप्रेमींसाठी मोठी अपडेट! ‘या’ दिवशी वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान भिडणार

क्रिकेटप्रेमींसाठी मोठी अपडेट! ‘या’ दिवशी वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान भिडणार

क्रिकेटजगताचंलक्ष आता वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेकडे लागलं आहे. चाहत्यांनी आतापासूनच त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान मॅचबद्दल आणि अधिक जाणून घेणार आहोत.

  • -MIN READ Trending Desk Maharashtra
    Last Updated: June 12, 2023, 12:50 IST
17

वन डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2023 बाबत मोठी बातमी समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 या महिन्यांमध्ये भारतात होणाऱ्या या स्पर्धेला 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेतील फायनल मॅच 19 नोव्हेंबर 2023 ला होणार आहे. याशिवाय, जगभरातील क्रिकेटप्रेमी वाट पाहत असलेली या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

27

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये रविवारी (11 जून 2023) भारतीय क्रिकेट टीमचा पराभव झाला. भारतीय क्रिकेट टीम गेल्या 10 वर्षांपासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. 2011 पासून भारतीय टीमला वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या स्पर्धेतील पहिली मॅच 5 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होईल. याच मैदानावर स्पर्धेतील फायनल मॅच 19 नोव्हेंबर 2023 रोजी होईल.

37

क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, वन डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 15 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडतील. या मॅचसाठी एक लाख क्रिकेटप्रेमी मैदानावर पोहोचू शकतात. बीसीसीआयनं वर्ल्ड कप स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रक आयसीसीसोबत शेअर केलंय. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व देशांना हे वेळापत्रक पाठवण्यात आलंय. या वेळापत्रकावर येणाऱ्या अभिप्रायानंतर ते पुढील आठवड्यापर्यंत जाहीर केलं जाऊ शकतं.

47

वेळापत्रकानुसार वन डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनल मॅचचे ठिकाण अद्याप निश्चित झालेलं नाही. या स्पर्धेत भारतीय क्रिकेट टीमच्या 9 मॅच होणार असून ही प्रत्येक मॅच वेगवेगळ्या मैदानावर आहे. भारतीय टीमची पहिली मॅच 8 ऑक्टोबर 2023 रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होऊ शकते. यानंतर भारतीय टीम 11 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्लीत अफगाणिस्तानशी, 15 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबाद येथे पाकिस्तानशी, तर 19 ऑक्टोबर 2023 रोजी पुण्यात बांगलादेशसोबत भिडणार आहे.

57

भारतीय क्रिकेट टीमची 22 ऑक्टोबर 2023 रोजी धर्मशाला येथे न्यूझीलंडविरुद्ध, 29 ऑक्टोबर 2023 रोजी लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्ध, 2 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबईत क्वालिफायर टीमविरुद्ध, 5 नोव्हेंबर 2023 रोजी कलकत्ता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि 11 नोव्हेंबर 2023 रोजी बेंगळुरूमध्ये क्वालिफायर टीमविरुद्ध मॅच होईल.

67

वन डे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट टीमच्या मॅच 5 मैदानावर होतील. अहमदाबाद येथील मैदानाशिवाय पाकिस्तान टीमचा 6 ऑक्टोबर 2023 आणि 12 ऑक्टोबर 2023 रोजी हैदराबादमध्ये क्वालिफायर टीमविरुद्ध, 20 ऑक्टोबर 2023 रोजी ऑस्ट्रेलिया आणि 23 ऑक्टोबर 2023 रोजी अफगाणिस्ताविरुद्ध बेंगळुरूमध्ये, 27 ऑक्टोबर 2023 रोजी चेन्नईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, तर 31 ऑक्टोबर 2023 रोजी बांगलादेश आणि 12 नोव्हेंबर 2023 रोजी इंग्लंडविरुद्ध कलकत्ता येथे मॅच होईल. पाकिस्तानची टीम 5 नोव्हेंबर 2023 रोजी बेंगळुरू येथे न्यूझीलंडसोबत भिडणार आहे

77

वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 10 टीम सहभागी होतील. सर्व टीम प्रत्येकी 9 लीग मॅच खेळतील. टॉप 4 टीम सेमी फायनलमध्ये जातील. 2019 च्या वन डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचं असचं स्वरूप होतं. 2019 मध्ये इंग्लंड टीम वन डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. फायनल मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा बाउंड्री काउंट नियमानं पराभव केला होता.

  • FIRST PUBLISHED :