जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही एक स्पोर्ट्स अँकर असून ती क्रिकेटच्या अनेक सामन्यांमध्ये अँकरिंग करताना दिसते.
बुमराह आणि संजनाची भेट 2019 मध्ये आयसीसीच्या वनडे वर्ल्ड कप दरम्यान झाली होती. त्यानंतर दोघांचे सूर जुळले आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
अखेर जसप्रीत बुमराह आणि संजना या दोघांनी कुटुंबाच्या सहमतीने 15 मार्च 2019 रोजी विवाह केला.
जसप्रीत बुमराह मागील बऱ्याच महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. यामुळे तो टी 20 वर्ल्ड कप, आयपीएल या सारख्या बऱ्याच महत्वाच्या क्रिकेट स्पर्धांना मुकला. मात्र दुखापतग्रस्त असताना त्याला पत्नी संजनाची भावनिक साथ लाभली.
जसप्रीत बुमराहच्या पाठीवर फेब्रुवारी महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्याचे बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे पुनर्वसन व्यवस्थापन सुरु आहे.