आयपीएलमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने 231 सामन्यात तब्बल 6957 रन्स करण्याचा विक्रम केला आहे.
शिखर धवन हा आयपीएलमधील सर्वाधिक रन्स करणारा दुसरा खेळाडू असून त्याने 210 सामन्यात 6476 रन्स केले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने 169 सामन्यात 6187 रन्स केले आहेत.
मुंबई इंडियन्सला 5 वेळा विजेतेपद जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा याने 234 सामन्यात 6060 रन्स केले आहेत.
सुरेश रैना याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याने 205 सामन्यात 5528 रन्स केले आहेत.
ए बी डिव्हिलिअर हा देखील आयपीएलमधून निवृत्त झाला असून त्याने 184 सामन्यात 5162 रन्स केले होते.
महेंद्र सिंह धोनी याने 204 सामन्यात 5039 रन्स केले आहेत.