आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने आयपीएल 2023 च्या 6 सामन्यांमध्ये आतापर्यंत तब्बल 23 सिक्स ठोकले आहेत. फाफने लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात 115 मीटर लांबीचा सिक्स मारला जो, यंदाच्या आयपीएल मधील सर्वात लांब सिक्स ठरला.
आरसीबीचा स्टार फलंदाज सध्या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल 2023 च्या 6 सामन्यांमध्ये 19 सिक्स मारले आहेत.
लखनऊ सुपर जाएंट्सचा विस्फोटक फलंदाज निकोलस पुरन याने 6 सामन्यांमध्ये 15 सिक्स ठोकले आहेत.
राजस्थान रॉयल्सचा धाकडं फलंदाज शिमरॉन हेटमायर याने देखील 6 सामन्यांमध्ये 15 सिक्स मारण्याचा पराक्रम केला आहे.
केकेआरचा स्टार फलंदाज व्यंकटेश अय्यर हा देखील सध्या उत्तम फॉर्मात असून त्याने आयपीएल 2023 मध्ये दुसरी सेंचुरी ठोकण्याचा मान मिळवला. त्याने देखील 15 सिक्स मारले आहेत.
लखनऊ सुपर जाएंट्सचा फलंदाज काइल मेयर्स याने 6 सामन्यांमध्ये 15 सिक्स ठोकले आहेत.