शिवम दुबेने त्याची मैत्रीण अंजुम खानशी 16 जुलै 2021 रोजी लग्न केले. शिवम आणि अंजुम खान हे दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. अंजुम खान उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील रहिवासी असून तिने अलीगड मुस्लिम विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.
अंजुम खानला मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात खूप रस असून तिने यापूर्वी एका हिंदी मालिकेत काम केले आहे. याशिवाय तिने एका म्युझिक अल्बममध्येही काम केले आहे.
लग्नानंतर वेगळ्या धर्मामुळे दोघांच्या लग्नात खूप अडचणी येत होत्या. परंतु टीकेला सामोरे जाऊन देखील कुटुंबाची साथ मिळाल्याने दोघे एकमेकांशी लग्न करू शकले.
शिवम आणि अंजुम खान यांचा विवाह हिंदू आणि मुस्लिम रितीरिवाजांनी झाला होता. यानंतर दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले. शिवमची पत्नी अंजुमने गेल्यावर्षी गोंडस मुलाला जन्म दिला.
शिवम दुबेच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 2019 मध्ये भारताच्या वनडे संघात पदार्पण केले होते. मात्र 1 सामना खेळूनही त्याला पुनरागमन करता आले नाही. त्याने टीम इंडियासाठी 13 टी-20 सामनेही खेळले आहेत ज्यात त्याने 17.5 च्या सरासरीने 105 धावा केल्या आहेत.