NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 'मॅन ऑफ द मॅच' अवॉर्ड जिंकणारे भारतीय क्रिकेटर्स

IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 'मॅन ऑफ द मॅच' अवॉर्ड जिंकणारे भारतीय क्रिकेटर्स

आयपीएल ही जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग पैकी एक आहे. जगभरातून खेळाडू या लीगमध्ये सहभागी होत असतात मात्र आयपीएलमध्ये नेहमीच भारतीय खेळाडूंचा दबदबा राहिला आहे. यंदाच्या आयपीएलला 31 मार्चपासून सुरुवात होणार असून आयपीएलच्या इतिहासात कोणत्या भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकला हे जाणून घेऊयात.

15

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार असण्यासोबतच सर्वाधिक वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेटर्सच्या यादीत तो प्रथम स्थानी आहे. एक दोन नाही तर रोहितने तब्बल 18 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

25

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा 'मॅन ऑफ द मॅच' अवॉर्ड जिंकणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नईला 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली असून तब्बल 17 वेळा धोनीने 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार पटकावला आहे.

35

कोलकाता नाईट रायडर्सचा धडाकेबाज फलंदाज युसूफ पठाण हा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. युसुफ पठाणने 16 वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकण्याचा विक्रम केला आहे.

45

Mr. IPL या नावाने प्रसिद्ध असलेला सुरेश रैना याने आतापर्यंत 14 'मैन ऑफ द मैच' अवार्ड जिंकले आहेत. त्याने चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना हे पुरस्कार जिंकले.

55

आरसीबी संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने 14 वेळा 'मैन ऑफ द मैच' अवार्ड जिंकले आहेत. दोन वर्ष विराट कोहली हा फॉर्ममध्ये नव्हता. त्यामुळे तो या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

  • FIRST PUBLISHED :