गेल्यावर्षी रिषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघात रिषभ गंभीर जखमी झाला होऊन त्याच्याच्या पायावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या दुखापतीमुळे रिषभ पुढील काही महिने क्रिकेट पासून दूर राहणार आहे.
आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स टीम आतापर्यंत सलग चार सामने हरली आहे. त्यांचा पुढील सामना 15 एप्रिल रोजी आरसीबी विरुद्ध होणार असून या सामन्यासाठी सध्या टीम कसून सराव करीत आहे.
अशातच दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार रिषभ पंतने बंगळुरू येथे जाऊन दिल्ली टीमची भेट घेतली. त्याने टीमचे प्रॅक्टिस सेशन सुरु असताना मैदानात जाऊन खेळाडूंची भेट घेतली.
रिषभच्या येण्याने दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. या भेटीचे फोटो आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर शेअर करण्यात आले आहेत.
यापूर्वी आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या होम ग्राऊंडवरील पहिला सामना पाहण्यासाठी रिषभ पंत स्टेडियमवर पोहोचला होता. तर टीमने देखील त्याची आठवण ठेऊन पहिल्या सामन्यात त्याची जर्सी डगआऊटमध्ये लावून ठेवली होती, याकृतीने त्यांनी फॅन्सचे मन जिंकले होते.