आयपीएल 2023 मध्ये पंजाबी किंग्सचा नव्या सिजनमधील 2 सामने जिंकले असून 2 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. अशातच पंजाब किंग्सच्या प्रत्येक सामन्यात दिसणाऱ्या एका सुंदर मिस्ट्री गर्लवर क्रिकेटचे चाहते फिदा झाले आहेत.
मिस्ट्री गर्लच नाव शशी धिमान असं असून ती पंजाब किंग्सच्या सोशल मीडिया पेजसाठी अँकरिंग करते.
सध्या पॉल्युलर होणारी मिस्ट्री गर्ल शशी धिमान ही स्टँडअप कॉमेडीयन असून तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
शशी धिमनने नव्या सिजनमध्ये पंजाबच्या संघातील ऋषी धवन सह काही खेळाडूंची मुलाखत घेतली असून त्याचे व्हिडिओ देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
शशी धिमान ही चंदीगडच्या पंजाबी कुटुंबातील आहे. ती 2022 पासून पंजाब किंग्स टीमच्या सोबत आहे.
शशी ही फार्मा साइंटिस्ट असून तिने शिक्षणपूर्ण केल्यानंतर आपली स्टँडअप कॉमेडीची आवड जोपासली. सध्या पंजाबच्या सामन्यातील तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.