नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करून गुजरातने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 204 धावा केल्या होत्या.
विजयासाठी 205 धावांचे आव्हान असताना केकेआरने देखील फलंदाजीची सुरुवात चांगली केली. परंतु गुजरातचा कर्णधार राशिद खान याने 16 व्या ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतल्याने केकेआरचे धाबे दणाणले.
सामना गुजरात टायटन्सच्या बाजूने झुकलेला असताना रिंकू सिंहने अविश्वसनीय खेळी करून गुजरातच्या होम ग्राउंडवर केकेआरला सामना जिंकवून दिला.
रिंकू सिंहच्या या खेळीनंतर त्याच्यावर सर्वस्थरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना अमेरिकेची पॉर्नस्टार केंद्रा लस्टने रिंकूसाठी एक ट्विट केलं आहे.
तिने तिचा आणि रिंकूचा एक फोटो मॉपकरून त्याला 'रिंकू द किंग' असे कॅप्शन दिले.
सध्या पॉर्नस्टार केंद्राने केललं हे ट्विट व्हायरल होत असून यावर नेटकरी लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.