भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार हा सर्वात लांब षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना त्याने 124 मीटर लांब षटकार मारला आहे.
रॉबिन उथप्पा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना 120 मीटर लांब षटकार मारला होता.
भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना 119 मीटर लांब षटकार मारला होता.
या यादीतील चौथे नाव स्टार फलंदाज गौतम गंभीर याचे आहे. गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना 117 मीटर लांब षटकार ठोकला होता.
चेन्नई सुपर किंग संघाला 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा महेंद्र सिंह धोनी हा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. चेन्नईकडून खेळताना धोनीने 115 मीटर लांब षटकार मारला होता.