NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 : आयपीएलमुळे हे पाच क्रिकेटर्स झाले मालामाल! केली 100 कोटींहून अधिक कमाई

IPL 2023 : आयपीएलमुळे हे पाच क्रिकेटर्स झाले मालामाल! केली 100 कोटींहून अधिक कमाई

31 मार्च 2023 पासून इंडियन प्रीमियर लीगचा 16वा सिझन सुरू होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातल्या यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. आयपीएल जवळ आल्याने क्रिकेट फॅन्समध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे. आयपीएलबाबत असं म्हटलं जातं, की ही स्पर्धा खेळाडूंचं आयुष्य बदलून टाकते. आयपीएलमुळे शेकडो खेळाडू कोट्यधीश बनले आहेत. काही खेळाडू तर असे आहेत जे आयपीएलच्या पहिल्या सीझनपासून ही स्पर्धा खेळत आहेत. महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांचा या मोजक्या खेळाडूंमध्ये समावेश होतो. आतापर्यंत प्रत्येक सीझन खेळणाऱ्या या खेळाडूंनी आयपीएलमधून किती कमाई केली आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो तेव्हा आयपीएलमधून 100 कोटींहून अधिक कमाई केलेल्या क्रिकेटर्स विषयी जाणून घेऊयात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
    Last Updated: March 29, 2023, 14:33 IST
15

1. एमएस धोनी : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक कमाई केलेली आहे. धोनीने गेल्या वर्षीपर्यंत (2022) आयपीएलमधून 164 कोटी 84 लाख रुपये कमावले आहेत. 2018 ते 2012 या कालावधीत त्याने वार्षिक 15 कोटी रुपये घेतले होते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याने आपलं शुल्क कमी करून 12 कोटी रुपये केलं आहे. त्याच्या मागील वर्षाच्या मानधनाचाही समावेश केला तर धोनीची आयपीएलची एकूण कमाई 176 कोटी 84 लाख रुपये होईल.

25

2. रोहित शर्मा : एकूण कमाईच्या बाबतीत रोहित शर्माने विराट कोहलीला मागे टाकलं आहे. रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई टीमला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. रोहितने गेल्या दीड दशकात आयपीएलमधून 162 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पुरस्कार आणि जाहिरातींमधून मिळणारं उत्पन्न वगळून ही कमाई आहे. 2022मध्ये रोहितने वार्षिक मानधनातून 16 कोटी रुपये मिळवले आहेत.

35

3. विराट कोहली : विराट कोहली 2008 साली झालेल्या पहिल्या आयपीएल सीझनपासून सातत्याने ही क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या वर्षापासून कोहलीची कामगिरी आणि कमाई वाढत गेली आहे. गेल्या सीझनपर्यंत कोहलीनं आयपीएलमधून 150 कोटी 20 लाख रुपये कमावले आहेत. 2018 ते 2021 या वर्षांत कोहलीने आरसीबीकडून वार्षिक 17 कोटी रुपये मानधन घेतलं होतं. गेल्या वर्षी त्याला 15 कोटी रुपये मानधन मिळालं होतं.

45

4. सुरेश रैना : चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू सुरेश रैनाचा आयपीएलशी दीर्घ काळ संबंध आहे. रैना 2022मध्ये ही स्पर्धा खेळला नव्हता. त्याने स्वतःची नोंदणी केली होती; पण कोणत्याही टीमने त्याच्यावर बोली लावली नाही. 2008पासून ही स्पर्धा खेळणाऱ्या रैनाने या स्पर्धेतून 100 कोटी आणि 74 लाख रुपये कमावले आहेत. त्याचं शेवटचं वार्षिक मानधन 11 कोटी रुपये होतं.

55

5. एबी डिव्हिलियर्स : दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार खेळाडू असलेल्या एबी डिव्हिलियर्सनं आयपीएलला एक वेगळा आयाम दिला. त्याच्या अष्टपैलू फटकेबाजीमुळे त्याला मिस्टर 360 डिग्री म्हटलं जातं. एबीने गेल्या हंगामापर्यंत आयपीएलमध्ये 100 कोटी 51 लाख आणि 65 हजार रुपये कमावले आहेत. ही रक्कम त्याला फ्रँचायझीकडून मानधन म्हणून मिळाली आहे. त्यात जाहिरात आणि इतर बक्षीस रकमेचा समावेश नाही. डिव्हिलियर्स 2021मध्ये आयपीएलचा (आरसीबी) शेवटचा सीझन खेळला. त्याचं शेवटचं वार्षिक मानधन 11 कोटी रुपये होतं.

  • FIRST PUBLISHED :