चेन्नईने 8 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला. परंतु या सामन्यापूर्वी चेन्नईचा स्टार खेळाडू बेन स्टोक्स याला सराव सत्रादरम्यान पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो मुंबई विरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या प्लेईंग 11 चा भाग नव्हता.
मुंबई विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा अनुभवी गोलंदाज दीपक चहर याची हैमस्ट्रिंगची दुखापत बळावल्याने तो देखील सामन्याच्या मध्यातच मैदान सोडून गेला.
बेन स्टोक्स आणि दीपक चहर यांच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यानुसार बेन स्टोक्सच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली असून याकरता त्याला डॉक्टरांनी कमीत कमी 7 दिवसांची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे तो राजस्थान विरुद्ध चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात संघाचाय प्लेईंग 11 चा भाग नसण्याची शक्यता आहे.
दीपक चहरची हॅमस्ट्रिंगची दुखापत बळावली आहे. लवकरच चहरच्या हॅमस्ट्रिंगचे स्कॅन केले जाणार असून तो या दुखापतीमुळे चेन्नईच्या पुढील काही सामन्यांतून बाहेर राहण्याची शक्यता आहे. मुंबई विरुद्ध सामन्यात या दुखापतीमुळे चहर केवळ एक ओव्हर टाकू शकला होता. मागील वर्षी देखील दीपक चहर दुखापतीमुळे आयपीएल 2022 खेळू शकला नव्हता.
आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा चौथा सामना राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यात धोनीला कदाचित बेन स्टोक्स आणि दीपक चहरची रिप्लेसमेंट शोधावी लागू शकते.