NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 : आयपीएलने एका रात्रीत या खेळाडूंना बनवलं करोडपती, आता टी 20 मध्ये गाजतंय नाव

IPL 2023 : आयपीएलने एका रात्रीत या खेळाडूंना बनवलं करोडपती, आता टी 20 मध्ये गाजतंय नाव

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 सिजनला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा क्रिकेट विश्वात उभरत्या खेळाडूंसाठी एक सुवर्णसंधी असून ही अशी क्रिकेट लीग आहे जिथे युवा खेळाडू आपली प्रतिभा दाखवतात. एवढेच नाही तर लिलावात खेळाडूंवर लावलेली बोली त्यांना रातोरात श्रीमंत बनवते. अशाच प्रकारे टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूंचे नशीब चमकले आहे.

16

आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याला प्रथम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत खरेदी केले होते. त्यानंतर टी २० मध्ये केलेल्या शानदार कामगिरीनंतर त्याची किंमत वाढली. गेल्या वर्षी तो लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार बनला असून यावर्षी त्याला आयपीएलसाठी 17 कोटी मिळाले आहेत.

26

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा एक महत्वाचा खेळाडू आहे. 2008 मध्ये राजस्थान संघाने त्याला अवघ्या 10 लाखात खरेदी केले. मात्र आता त्याची किंमत गगनाला भिडली आहे. आयपीएल 2023 साठी त्याच्यासाठी चेन्नईने 16 कोटी रुपये मोजले आहेत.

36

टीम इंडियासाठी द्विशतक झळकावणारा युवा खेळाडू इशान किशन याची आयपीएलमधील कामगिरी जबरदस्त राहिली आहे. 2016 मध्ये गुजरात लायन्सने त्याला 35 लाख रुपयांना खरेदी केले होते. मात्र युवा फलंदाजाने आपल्या कामगिरीने त्याच्या किंमतीत मोठी वाढ केली. आता ईशान किशनला आयपीएल २०२३ खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून 15.2 कोटी रुपये मिळतात.

46

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली गुजरातने गेल्यावर्षी आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. परंतु 2015 मध्ये हार्दिक पांड्याची किंमत फक्त 10 लाख रुपये होती. परंतु त्याने दरवर्षी अपेक्षेपेक्षा जास्त कामगिरी केली. ज्यामुळे त्यांची किंमत आता गगनाला भिडली असून यंदा गुजरात टायटनने त्याला 15 कोटी रुपये दिले आहेत.

56

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आयपीएलमधील आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. सॅमसनला 2012 मध्ये आयपीएलसाठी 8 लाख रुपये मिळाले होते. आता त्याची किंमत 14 कोटी रुपये आहे.

66

भारताचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव याला आयपीएलनेच ओळख मिळून दिली. मिस्टर 360 डिग्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमारला त्याच्या पहिल्या आयपीएल सीझनसाठी 10 लाख रुपये मिळाले होते. परंतु आता मुंबई इंडियन्समध्ये त्याची फी आठ कोटी रुपये इतकी आहे.

  • FIRST PUBLISHED :