आयपीएल 2o23 मधील 62 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात नेहमी गडद निळ्या रंगाच्या जर्सीत दिसणारा गुजरातचा संघ लॅव्हेंडर रंगाची जर्सी घालूं मैदानात उतरला आहे.
13 मे रोजी गुजरात टायटन्सच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. गुजरात टायटन्स फ्रेंचायझीने कर्करोगाविरूद्ध जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने लॅव्हेंडर रंगाची जर्सी परिधान केली आहे.
दरवर्षी हजारो लोकांना कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराची लागण होत असते. तेव्हा या आजाराचे योग्यवेळी निदान होऊन योग्य उपचार करण्याची गरज आहे.
गुजरात टायटन्स पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ देखील दरवर्षी आयपीएलच्या एका सामन्यात हिरव्या रंगाची जर्सी घालताना दिसतो. त्यामाध्यमातून ते "निसर्गाचं रक्षण हेच मानवाचं रक्षण" असा पर्यावरणाचा बचावाचा संदेश देत असतात.
गुजरात टायटन्स सध्या आयपीएल पॉईंट टेबलमध्ये 8 सामने जिंकत 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा विजय झाल्यास ते आयपीएल 2023 च्या प्ले ऑफमध्ये जाणारा पहिला संघ ठरतील.