NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 : गोविंदाच्या जावयाचा आयपीएलमध्ये जलवा, KKR ला जिंकवून देणार IPL ची ट्रॉफी?

IPL 2023 : गोविंदाच्या जावयाचा आयपीएलमध्ये जलवा, KKR ला जिंकवून देणार IPL ची ट्रॉफी?

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सीजनला 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलची दिमाखदार ओपनिंग सेरेमनी आणि पहिला सामना पारपडणार असून यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. प्रत्येक संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याच्या ध्येयानेच मैदानात उतरणार असून प्रेक्षकांना यंदा देखील रोमांचक सामने पाहायला मिळतील. यावर्षी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा याच्या जावयाचा जलवा आयपीएलमध्ये पाहायला मिळणार आहे. तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार असून यंदा श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत त्याला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

16

आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर सध्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्याला डॉक्टरांनी काही आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून तो आयपीएलच्या पहिल्या सत्रात खेळताना दिसणार नाही.

26

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व कोण करणार? याविषयी अनेक चर्चा होत्या. परंतु केकेआर संघाने श्रेयसच्या अनुपस्थितीत संघाचा धाकडं खेळाडू नितीश राणा हा केकेआरचा कर्णधार असेल अशी घोषणा केली.

36

नितीश राणा हा अष्टपैलू खेळाडू असून तो 2018 पासून केकेआर संघाचा भाग आहे. त्याने आयपीएल कारकिर्दीत 91 सामने खेळले असून 177 धावा आणि 7 विकेट्स घेतल्या आहेत. केकेआरचा नवा कर्णधार नितीश राणा हा बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा जावई आहे.

46

नितीश राणाची पत्नी सांची मारवाह ही अभिनेता गोविंदाची भाची आहे. तसेच कॉमेडीयन कृष्णा अभिषेकच्या काकांची ती मुलगी आहे.

56

29 वर्षीय नितीश राणाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दिल्ली टीमच्या 12 सामन्यांमध्ये दिल्ली संघाचं नेतृत्व केलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने 8 मॅच जिंकले होते. तर 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव केला होता.

66

2012 आणि 2014 मध्ये केकेआर टीमने आयपीएलची ट्रॉफी जिंकली असून आता नितीशच्या नेतृत्वाखाली केकेआरची टीम काय कमाल करून दाखवते हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

  • FIRST PUBLISHED :