भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर हसू दिसण ही फार दुर्मिळ, पण या आक्रमक फलंदाजाच्या गोंडसपणाने मुलींना नेहमीच भुरळ पाडली आहे. 2007 T20 वर्ल्डकप आणि 2011 ODI वर्ल्डकपचा हिरो ठरलेला गौतम गंभीर वडिलांच्या मित्राच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. सुरुवातीला दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर अखेर प्रेमात झाले.
गौतम गंभीरने नताशा जैन हिच्या सोबत 28 ऑक्टोबर 2011 रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांना आजीन आणि अनाइझा अशी दोन मुलं आहे.
नताशा ही एका राजघराण्यातील मुलगी असून तिच्या कुटुंबाचा करोडोंचा व्यापार आहे. नताशा ही फिटनेस फ्रिक असून ती जीवनात फिटनेसला खूप महत्व देते.
गौतम गंभीरने क्रिकेटनंतर राजकारणाची वाट धरली, आणि तो सध्या देशाच्या पार्लमेंटमध्ये खासदार म्हणून जनतेचे प्रश्न मांडतो. परंतु क्रिकेट आणि राजकारण या दोघांमध्ये सक्रिय असताना त्याला पत्नी नताशा हिची मोठी साथ लाभते.
नताशा ही सुंदरता आणि तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमी चर्चेत असते. तिची सुंदरता ही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकते. नताशा सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असून तिचे फॅन्स फॉलोवर्स देखील अनेक आहेत.